आजपासून आठवा वेतन आयोग लागू? आता सरकारी कर्मचाऱ्यांना किती पगार मिळणार पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Eighth Pay Commission: केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असून, हा आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पगारवाढ, महागाई भत्ता आणि पेन्शन सुधारणा याबाबत चर्चा सुरू होती. अखेर या निर्णयामुळे सरकारी सेवेत असलेले कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी दोघांच्याही अपेक्षांना बळ मिळालं आहे.

आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या सेवारत कर्मचाऱ्यांचे वेतन, विविध भत्ते आणि पेन्शन नव्याने ठरवले जाणार आहेत. महागाई सातत्याने वाढत असताना कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावर त्याचा ताण जाणवत होता. याच पार्श्वभूमीवर आयोगाकडून महागाई भत्त्याचा (DA) विचार करूनच नवे वेतनमान ठरवले जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे केवळ पगारच नाही तर एकूणच मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Eighth Pay Commission

या वेतन आयोगाच्या कक्षेत सुमारे 5 कोटी केंद्र सरकारी कर्मचारी, संरक्षण दलातील कर्मचारी यांचा समावेश असून, त्याचबरोबर जवळपास 6.5 कोटी निवृत्त पेन्शनधारकांनाही याचा थेट फायदा होणार आहे. केंद्र सरकार दर दहा वर्षांनी वेतन आयोग स्थापन करते आणि त्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या पगार व पेन्शनचे पुनरावलोकन केले जाते. सातव्या वेतन आयोगानंतर आता आठव्या वेतन आयोगाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पगार किती वाढणार?

तज्ज्ञांच्या मते, आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर सुमारे 2.15 असण्याची शक्यता आहे. हा फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात मोठी वाढ दिसून येईल. सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकूण 18 स्तर आहेत. स्तर 1 मध्ये प्रवेश-स्तरावरील कर्मचारी येतात, स्तर 2 ते 9 मध्ये गट ‘क’, स्तर 10 ते 12 मध्ये गट ‘ब’, तर स्तर 13 ते 18 मध्ये गट ‘अ’ अधिकारी समाविष्ट आहेत.

उदाहरणार्थ, स्तर 1 वरील कर्मचाऱ्यांचा सध्याचा किमान मूळ पगार 18,000 रुपये आहे. फिटमेंट फॅक्टर 2.15 लागू झाल्यास हा पगार थेट सुमारे 38,700 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, म्हणजेच जवळपास 20,700 रुपयांची थेट वाढ. स्तर 5 वरील कर्मचाऱ्यांचा सध्याचा पगार 29,200 रुपये असून, तो वाढून सुमारे 62,780 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. स्तर 10 मधील कर्मचाऱ्यांचा पगार 56,100 रुपयांवरून अंदाजे 1,20,615 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. तर स्तर 15 वरील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सध्याचा 1,82,200 रुपयांचा पगार सुमारे 3,91,730 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सर्वात वरच्या स्तर 18 मधील अधिकाऱ्यांचा पगार 2,50,000 रुपयांवरून सुमारे 5,37,500 रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या निर्णयामुळे केवळ सरकारी कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न वाढणार नाही तर बाजारातील खरेदी क्षमता वाढून अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल असे जाणकारांचे मत आहे. सध्या कर्मचारी संघटनांकडून वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया डीए समावेश आणि पेन्शन गणनेबाबत अधिक स्पष्ट नियमांची मागणी केली जात आहे. मात्र आठव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, 2026 पासून पगारात होणारी ही मोठी वाढ अनेक कुटुंबांसाठी आर्थिक स्थैर्य घेऊन येणारी ठरणार आहे.

1 thought on “आजपासून आठवा वेतन आयोग लागू? आता सरकारी कर्मचाऱ्यांना किती पगार मिळणार पहा”

Leave a Comment

error: Content is protected !!